आदई, पनवेल 

पियुष संगीत संस्थेच्या संगीत गुरू पद्मजा जोशी यांच्या शिष्यगणांनी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन केले. ऑनलाईन स्वरूपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात या शिष्यगणांनी गायन सादर करून गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  

आदई येथील संगीतशिक्षिका पद्मजा जोशी यानी आजपर्यंत शास्त्रीय व सुंगम संगीतामधे तसेच हार्मोनियम आणि सिंथेसायझर या वांद्यांमधे अनेक शिष्य घडवलेले आहेत. त्याना गुरुवंदना म्हणून हा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमात अश्‍विनी मोहिते, रचना जोशी, नीला पुरोहित,अनघा अंबपकर,सविता शिंदे, प्रारंभ लवेकर,गायत्री कुलकर्णी,  आराध्या गावंडे , कनिष्क चुनारकर, ईश्‍वरी हंचाटे, पार्थ धनासुरे या विद्यार्थ्यानी गायन केले. त्याना स्वतः पद्मजा जोशी यानी संवादिनी व प्रतिक जोशी याने तबलासाथ केली. ज्येष्ठ शिष्या सुषमा गोखले यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले