अलिबाग

कारगिल युद्धात शहीद झालेल्या अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथील शहीद निलेश तुणतुणे यांचा  स्मृतिदिन यंदा कोरोनामुळे साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी रायगड पोलीस दलाने सशस्त्र मानवंदना देताना तीन फैरी झाडल्या.   स्मृतिदिनानिमित्त शहीद निलेश तुणतुणे यांना अलिबाग तालुका पंचायत समितीचे सभापती प्रमोद ठाकूर, उपसभापती मीनल ठाकूर, यांच्या हस्ते    निलेश तुणतुणे यांच्या स्मृतिस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहीद निलेश तुणतुणे स्मारकाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य द्वारकानाथ नाईक, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, पंचायत समिती गट विकास अधिकारी डॉ दीप्ती पाटील, सहाण ग्रामपंचायतीचे सरपंच राखी पाटील, शहीद तुणतुणे यांचे वडील नारायण रामभाऊ तुणतुणे, मातोश्री निर्मला तुणतुणे, गट शिक्षण अधिकारी प्रकाश कोकाटे, माजी सभापती प्रकाश पाटील, विस्तार अधिकारी के आर पिंगळा, केंद्र प्रमुख भारत पाटील आदी उपस्थित होते.

दरवर्षी शहीद निलेश तुणतुणे यांच्या स्मृतिस अभिवादन करण्यासाठी परिसरातील असंख्य नागरिक येतात. मात्र, यंदा कोरोनाचे संकट आणि टाळेबंदीमुळे हा स्मृतिदिन सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अवश्य वाचा