श्रीवर्धन 

  महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होऊन आठ महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे.शासनाच्या नवनवीन घोषणा होत आहेत. नव्याने निवडून आलेल्या आमदारांना विकास कामांसाठी पन्नास लाखांचा निधी देण्याचे जाहीर झाले आहे. परंतु रायगडमधील माजी आमदारांनी त्यांच्या  कार्यकाळात मंजूर केलेल्या विकास कामांसाठीचा निधी मात्र राज्य  शासनाने अद्याप न दिल्याने आमदार निधीतून कामे करुन दिलेले ठेकेदार  मात्र अडचणीत सापडले आहेत. या  करिता  आगामी सणांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य  शासनाने तात्काळ सदर निधी वर्ग करावा अशी मागणी शेकाप  नेते व माजी आमदार  पंडित  पाटील  यांनी केली आहे.

 पाटील यांच्या म्हणण्यानुसार राज्य शासनाने रायगडमधील माजी आमदार सुरेश लाड,धैर्यशील पाटील, मनोहर भोईर,सुभाष पाटील,अवधूत तटकरे  यांच्या  कार्यकाळातील त्यांचा आमदार निधी,तसेच पर्यटन विकास निधी अद्याप जिल्हा नियोजन मंडळाकडे वर्ग  केलेला नाही. जिल्ह्यातील अनेक ठेकेदारांनी आमदार निधी तसेच पर्यटन निधीमधून विकास कामे पूर्ण केली आहेत.या आमदार निधी व पर्यटनस्थळे विकासाचा निधी शासनाकडून जिल्ह्याला मिळणे गरजेचे आहे. परंतु तो अद्याप न मिळाल्याने ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत. तरी येत्या गणेशोत्सवापूर्वी राज्य शासनाने सदर निधी द्यावा अशी आग्रही मागणी श्री. पंडित पाटील यांनी केली आहे. 

 

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन