नेरळ  

मानस फाउंडेशनच्या वतीने आणि कोरो संस्थेच्या सहकार्याने आदिवासी मुलांना पुस्तकांची पेटी भेट देण्यात आली आहे.

 अवांतर वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देणे, त्यांना वाचनाची गोडी लावणे व त्यातून त्यांचा आत्मविश्‍वास वाढविणे व यातून उज्वल भविष्य होण्याच्या उद्देशाने पहिले पाऊल कर्जतमधील भक्ताची वाडी व बोरवाडी येथे दोन फिरत्या वाचनालयाची सुरुवात करण्यात आली. ग्रासरुट नेतृत्व कार्यक्रमातील लीडर मयूर पादिर यांच्या कार्यक्रम निधीतून सदर कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात मोग्रज ग्रामपंचायतीच्या सदस्य आशा रसाळ,सामाजिक कार्यकर्ते  मनोज भोईर, पाथरज मधील पोलीस पाटील  मारुती लोभी यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर वाचनालयाचे संचलन आदिवासी विद्यार्थ्यांकडून होणार आहे.