पाली / वाघोशी 

 पाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पालीत सर्व ठिकाणी घंटा गाड्या फिरून कचरा गोळा केला जातो. मात्र अजूनही काही लोक रस्त्याच्या कडेला, गटारात व ओहळात कचरा टाकत असल्याने कचर्‍याची समस्या पुन्हा डोकेवर काढत आहे.

भाजीपाल्याचा कचरा थेट येथील बसस्थानकाजवळील ओहळात एकजण टाकत असल्याचा व्हिडीओ नुकताच सर्वत्र फिरत आहे. यामुळे पालिकरांचे आरोग्य पुन्हा धोक्यात आले आहे.  घंटागाडी चालु करून नागरिकांचा त्रास कमी केला आहे.  मात्र तरीही रस्ते, गटारे आणि ओहळात कचरा टाकणारे लोक इतर नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. नागरिकांनी कुठेही कचरा टाकू नये. आपल्या घराबाहेर येणार्‍या घंटागाडीतच कचरा टाकावा असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य अमित निंबाळकर यांनी केले आहे.

अवश्य वाचा