पाली/बेणसे 

शेकाप  पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष आरिफ मणियार यांचे वडील गफूरभाई महमूद मणियार (वय 75)  यांचे निधन झाले. गफूरभाई मणियार यांच्या निधनानंतर शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील, मा.आ.धैर्यशील पाटील, अ‍ॅड.  निलिमाताई पाटील, राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नेते वसंतराव ओसवाल, शेकाप नेते सुरेशशेठ खैरे आदींसह विविध सामाजिक , राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करून आदरांजली वाहिली.   पाली मुस्लिम समाज सदर कमिटीत सतत 10 वर्षं खजिनदार पद सांभाळले.रायगड जिल्हा मुस्लिम वेल्फेर चा 2017 चा उत्कृष्ट तालुका समाज सेवक पदाने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.  त्यांच्या पच्छात  आरिफ, आशिक, आबीद, अनिस, अजित मणियार आदी पाच मुले  व पत्नी अमिना असा परिवार आहे.

 

अवश्य वाचा