Wednesday, December 02, 2020 | 11:30 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

या किल्यावर जाणार्‍या पर्यटकांसाठी खुशखबर
रायगड
21-Nov-2020 06:54 PM

रायगड

अलिबाग 

अनलॉक प्रक्रियेनंतर राज्य सरकारने पर्यटनस्थळे सुरु केली आहेत. त्यामुळे जवळपास गेले सहा महिने बंदिस्त असलेले पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. अशातच रायगडावर जाण्यासाठी उपलब्ध असलेला रोपवे जागेच्या वादामुळे बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गडावर येणार्‍या पर्यटकांना गैरसोय सहन करावी लागत आहे.

परिणामी, शिवभक्तांना तसेच पर्यटकांना सुरक्षितपणे किल्ले रायगडावर जाता यावे, यासाठी रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून नवा सुरक्षित आणि वैशिष्ट्यपूर्ण रोपवे उभारण्याची घोषणा रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे यांनी शुक्रवारी महाड येथे केली.

रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगडावर सुरू असलेल्या संवर्धन कामांची पाहणी करण्यासाठी खा. संभाजीराजे गडावर आले होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. सध्या रायगडावर जाण्यासाठी उपलब्ध असलेला रोपवे जागेच्या वादामुळे बंद ठेवण्यात आला आहे.

परिणामी, गडावर येणार्‍या पर्यटकांना विशेषतः अबालवृद्धांना गैरसोय सहन करावी लागत आहे. त्यामुळे पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या रायगड किल्यावर प्राधिकरणाच्या माध्यमातून नव्या रोपवेसाठी 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून हा नवा रोपवे गडाच्या वैभवाला साजेसा असा उभारण्यात येईल.

या घोषणेमुळे शिवभक्तांसह पर्यटकांमध्येही समाधानाचे वातावरण पसरले असून या मार्गाचे प्रत्यक्षात कधी काम सुरु होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top