Tuesday, April 13, 2021 | 01:25 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

मोफत प्रवास योजनेने सावित्रीच्या लेकी ज्ञानमंदिरात
रायगड
07-Apr-2021 06:28 PM

रायगड

 

। अलिबाग । वर्षा मेहता ।

शासनाकडून मुलींसाठी विविध योजना राबविल्या जातात. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. याच पार्श्‍वभुमीवर ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी परिवहन मंडळाकडून अहिल्याबाई होळकर मोफत प्रवासाची सवलत सुरु करण्यात आली. या योजने अंतर्गत अलिबाग तालुक्यातील 3 हजार 292 विद्यार्थीनी मोफत प्रवासाचा लाभ घेत आहेत. या मोफत प्रवासाने शिक्षणापासून वंचित राहणार्‍या शेकडो मुली ज्ञानमंदिरात दाखल झालेल्या आहेत.

अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी एस.टी.ने मोफत प्रवास सवलत लागू आहे. अलिबाग तालुक्यात 2021 मध्ये 3,292 विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थिनींना कसा लाभ घेता येईल, यासाठी परिवहन मंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. महाविद्यालय तसेच शाळांमध्ये या योजने संदर्भात माहिती दिली जात आहे.एसटी महामंडळामार्फत समाजातील विविध वंचित घटकांना प्रवास सवलत देऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो. यात प्रमुख्याने विद्यार्थी सवलत, ज्येष्ठ नागरीक सवलत, अंध-अपंगांना असलेली सवलत याचा राज्यातील लाखो घटकांना लाभ मिळत आहे. 

 या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थिनींना लाभ कसा घेता येईल, यासाठी प्रयत्न करीत आहोत. या योजनेला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेमुळे विद्यार्थिनींना खूप फायदा झाला आहे. जेएसएम, कन्या शाळा अशा अनेक शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थिनींनी नोंदणी केली आहे.

 एच.आर.भोईर, वाहतूक नियंत्रक

  लाभार्थी 2021

अलिबाग - 2,228

पोयनाड - 304

रेवदंडा - 760

एकूण - 3,292

 

 

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top