रायगड
कोर्लई
पालघर जिल्ह्यातील वसई-मोरेगांव विरार (पुर्व) येथे व्हेंचर फाऊंडेशन तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
व्हेंचर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विक्रांत राऊळ, मुंबई सचीव शोभा राघवन, संयुक्त सचीव रेखा पवार, जयश्री सोनी,तज्ञ डॉ. चंद्रशेखर नेरकर आदी.मान्यवर यावेळी उपस्थित होते. सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तज्ञ डॉ. चंद्रशेखर नेरकर यांच्या टिमने मोरेगांव विरार (पुर्व)भागातील लोकांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये मधूमेह, ताप व साधारण तपासणी करण्यात आली. यावेळी व्हेंचर फाऊंडेशन तर्फे रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली.