अलिबाग 

कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे शाळा बंद असून, मुलांचे अतोनात नुकसान होत आहे. यात विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा वेळ वाया जाऊ नये याकरिता हे ऑनलाईन लाईव्ह क्लासेस घेण्यात येणार आहेत. जेणेकरून मुले सर्व अभ्यास पूर्ण करू शकतील आणि त्यांचा अमूल्य वेळ सत्कारणी लागेल, तसेच या क्लासेसमुळे विद्यार्थी घराबाहेर

पडणार नाहीत.

प्रथमच स्कूल सेक्शनसाठी ऑनलाईन आणि लाईव्ह क्लास जुलैपासून सकाळी 9 पासून सुरू केले आहेत. सदर क्लासेस विद्यार्थ्यांसाठी ते स्वतः मोफत घेणार आहेत. पाचवीसाठी सकाळी 9 ते 11 व आठवीसाठी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत ऑनलाईन शिकता येईल. यासाठी विद्यार्थ्याला फक्त आपले नाव आणि मोबाइल नंबर सरांच्या मोबाइलवर पाठवायचा आहे. जेणे करून तुम्हाला ते दि. 5 जुलैपासून दर रविवारी सुरू होणार्‍या बॅचमध्ये समावेश करून घेतील. नंतर तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरून र्ींरळीहपर्रींळ रलरवशू श्रर्ळींश ीशीीळेप हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून आपला मोबाइल नंबर रजिस्टर करा. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्टुडंट लॉगीनमधून 5ीील1806 हा बॅच कोड टाकून व आठवीच्या विद्यार्थ्यांनी 8ीील1806 हा बॅच कोड टाकून आपली नोंदणी करू शकता. आणि, निश्‍चिंतपणे लाईव्ह लेक्चर्स

पाहू शकता.

अधिक माहितीकरिता सुगम ठाकूर  8830115592, प्रा. राजेंद्र मढवी 9967096513, प्रमोद ठाकूर 8976597894, संतोष पवार 9619326944 या नंबरवर संपर्क साधावा.