मुरुड जंजिरा 

मच्छीमारी हंगामाला सुरुवात झाली असली तरी समुद्रातून पकडून आणलेली मासळी मुंबईतील ससून डॉक तसेच भाऊचा धक्का येथे विकता येत नसल्याने ही मासळी उतरवण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने आंगरदांडा येथील जेट्टी खुली करुन द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असा इशारा मुरुड तालुका नाखवा संघाचे प्रमुख समनव्यक प्रकाश सरपाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

मुंबई येथील मासळी चे मुख्य मार्केट बंद असल्याने राजपुरी,,दिघी,मुरुड  व एकदरा  येथील मच्छिमारांना मासळी विकता येत नसल्यामुळे पकडलेली मासळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आगरदांडा येथील जेट्टी मुंबई पासून जवळ असल्याने व मोठ्या बोटींना सोईस्कर असा धक्का असल्याने मुंबई चे बाजार सुरु होई पर्यंत किमान दोन महिन्यांसाठी आगरदांडा येथे मच्छिमारांना जेट्टी उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी शुक्रवारी मुरुड येथे पत्रकार परिषद झाली यावेळी हा इशारा देण्यात आला. यावेळी जय भवानी मच्छिमार सोसायटीचे चेरमनमहेंद्र गार्डी, माहेश्‍वरी मच्छिमार सोसायटीचे चेरमन धुर्व लोदी,दामोदर बैले,सागर कन्या मच्छिमार संघाचे संचालक भालचंद्र गार्डी,   चंद्रकांत सरपाटील    आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रकाश सरपाटील म्हणाले कि, महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाकडे सहा पेक्षा जास्त जेट्ट्या आहेत.आगरदांडा येथे तीन जेट्ट्या असून त्यातील कोणतीही एक जेट्टी मच्छिमारांना दिल्यास आमचे काम सुकर होणार आहे.मुबईचे व्यापारी आगरदांडा येथे येण्यास तयार आहेत.परंतु बोटी बंदराला लावून न दिल्यामुळे आमचा माल फुकट जात आहे.व्यापारी आले तर रोख स्वरूपात व्यवहार झाल्याने क्रय शक्ती वाढणार आहे.स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल,स्थानिकांना स्वस्त किमतीती मासळी उपलब्ध होणार आहे.

25 कोटी रुपयांची उलाढाला

एकदरा,राजपुरी,दिघी,व मुरुड परिसरातील सुमारे दोनशे होड्या मच्छीमारी करण्यासाठी समुद्रात जात असतात. समुद्रातून माघारी मासळी घेवून आल्यानंतर एका महिन्याला सुमारे 25 कोटी रुपयांची उलाढाल  होत असते. त्या दृष्टीने महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने आगरदांडा येथे जेट्टी उपलब्ध करुन द्यावी अशी मच्छीमार बांधवांची मागणी आहे.

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही