Tuesday, April 13, 2021 | 12:09 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

वादळीवार्‍याची मच्छिमारांना भीती
रायगड
07-Apr-2021 06:18 PM

रायगड

 

  । मुरूड । प्रकाश सद्रे  ।

मंगळवारपासून अरबी समुद्रात दक्षिणेकडून उत्तरेकडे हेटशी वारे सुरू झाल्याने मासेमारी सोडून नौकांना पुन्हा किनार्‍यावर परतावं लागणार आहे.तशी भीतीरायगड मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी व्यक्त केली. हेटशी वारे वादळी हवामानाचा इशारा देणारी असतात.यामुळे  खोल समुद्रात मासळी देखील गायब होते,अशी माहिती बैले यांनी दिली.

 होळीनंतर मोठ्या मासेमारी नौका खोल समुद्रात मासेमारी साठी गेलेल्या आहेत.अशातच आता लॉकडाऊन सुरू झाला आहे.त्यामुळे जरी मासळी मिळाली तरी मुंबईतील मार्केटमध्ये भाव मिळणार नाही, शिवाय किनार्‍यावर येणारी मासळी देखील मिळणे बंद झाले आहे.

मनोहर बैले,मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष 

काही नौका समुद्रात मासेमारीस गेल्या नाहीत, त्यांची आर्थिक स्थिती गंभीर होण्याची मोठी शक्यता दिसून येत आहे. मुरुडच्या मार्केटचा विचार केला तर जेमतेम मासळी उपलब्ध दिसत असून भाव तिप्पट झाले आहेत. मुळात मासळी मिळत नसल्याने मच्छिमार हवालदिल झाले आहेत.  कोट्यवधी रुपयांचा डिझेल परतावा शासनाकडून 2017 पासून मिळालेला नाही. सतत बदलते हवामान आणि लॉकडाऊन परिस्थिती मुळे इकडे आड तिकडे विहीर अशी मच्छिमारांची अवस्था झाल्याचे दिसून येते. मुरूड तालुक्यातील कोळी महिला खाडीपट्ट्यातील मासळी आणि सुकी मासळी विक्री करून कसाबसा उदरनिर्वाह चालवताना दिसतात.

हेटशी वारे देखील वाहू लागल्याने रायगडाच्या समुद्रात दुहेरी संकट घोंगावत आहे.आता मासेमारी सीझन देखील हातून जाईल असे दिसून येत आहे. म महिन्यात देखील पाऊस पडू शकतो असे अनुमान व्यक्त होत आहे. मासेमारी उत्पादन केरळ राज्याप्रमाणे वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अधिक गंभीरपणे लक्ष घालणे गरजेचे आहे, असे मत जेष्ठ मच्छिमारांनी बोलताना व्यक्त केले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top