Saturday, December 05, 2020 | 11:20 AM

संपादकीय

गुंतवणुकीसाठी स्पर्धा

महाराष्ट्रातील गुंतवणूक आपल्या राज्यात यावी यासाठी यापूर्वी स्पर्धेत असलेल्या...

नागोठण्यातील मच्छीविक्रेत्यांचे पुन्हा रस्त्यावर बस्तान.....
रायगड
22-Nov-2020 05:51 PM

रायगड

वाकण 

 नागोठणे ग्रामपंचायतीकडून येथील मासळी बाजारात बसविण्यात आलेल्या मच्छिविक्रेत्यांनी काही दिवसांपासून आपला मोर्चा पुन्हा एकदा रहदारीच्या रस्त्याकडे वळविला आहे. याचबरोबर खुमाचा नाका, बँक ऑफ इंडिया समोरील रस्ता व वनखात्यासमोरील रस्त्यावरही बाहेरील मच्छी विक्रेते येऊन मच्छी विक्री करीत आहेत. त्यामुळे या सर्वच ठिकाणी मच्छी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

  नागोठणे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांचे रस्त्यावरील मच्छी विक्रेत्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे. त्यामुळेच ग्रामपंचायत प्रशासनाने अतिशय मेहनत घेऊन मासळी बाजारात बसविलेल्या व रहदारीच्या रस्त्यावर पुन्हा बस्तान बसविलेल्या या मच्छी विक्रेत्यांवर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top