श्रीवर्धन 

कोरोना प्रादुर्भावाच्या भयानक संकटामुळे लॉक डाऊन असल्यामुळे गेल्या सुमारे चार महिन्यांपासून ग्रामीण भागातील हजारो लोकांचा रोजगार बुडाला आहे.त्यामुळे त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे .त्यामुळे केंद्राची रोजगार हमी योजना राज्यात त्वरित सुरु करुन त्यासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेकापचे नेते आणि माजी आमदार श्री.पंडित पाटील यांनी श्रीवर्धन येथे बोलतांना केली

निसर्ग चक्री वादळाच्या मदती बाबतचा आढावा तसेच नमागरिकांच्या प्रश्‍नांसदर्भात त्यांनी  श्रीवर्धनचे उप विभागीय अधिकारी अमित शेडगे यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसिलदार सचिन गोसावी, शे.का.प.चे श्रीवर्धन तालुका चिटणीस वसंत यादव, गोंडघरचे श्री. स्वप्निल बिराडी व शे.का.प.चे काही कार्यकर्ते उपस्थित होते.

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद