Wednesday, May 19, 2021 | 02:04 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

अलिबाग तालुक्यात आज कोरोनाने आठ रुग्णांचा मृत्यू
रायगड
02-May-2021 08:46 PM

रायगड

अलिबाग । विशेष  प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यात रविवारी कोरोनाच्या 225 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 8 रुग्ण उपचारादरम्यान दगावले आहेत. तर, दिवसभरात 64 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सद्यःस्थितीत तालुक्यात 3 हजार 100 रुग्ण उपचार घेत आहेत.

आजअखेर अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 9 हजार 980 झाली आहे. यापैकी 231 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 6 हजार 649 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 3 हजार 100 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top