अलिबाग 

कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्यां करुना मोरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप करुन त्यांची बदनामी केल्याप्रकरणी कोल्हरे ग्रामपंचायतमधील धामोते गावातील सात आणि बोपेले गावातील एक अशा आठ जणांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये शिवसेनेच्या एका पदाधिकार्‍यासह ग्रामपंचायतीच्या माजी सदस्याचाही समावेश आहे. या कारवाईने कर्जतच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महेश सुरेश विरले,वंदना बाळाराम पेरणे, चंद्रकांत धर्मा बोंबे,पद्माकर गोमारे, सोमनाथ गणपत विरले,रोशन संजय म्हसकर,राजेश विष्णू विरले,भरत पदू पेरणे अशा आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

कोल्हेरे ग्रामपंचायतीच्या सदस्या आणि बोपल्या गावच्या रहिवासी असलेल्या करुना मोरे या ग्रामपंचायतीच्या सदस्या असताना त्यांनी भ्रष्टाचार केल्याची तक्रार पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांकडे करण्यात आली होती. मात्र गटविकास अधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीत कोणतेही तथ्य आढळून नआल्याने आपली जाणिव पुर्वक बदनामी केल्याची तक्रार सदस्या करुन मोरे यांनी कर्जत पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांच्याकडे केल्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

नेरळ पोलीस ठाणे येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक टी एन सावंजी यांनी हा गुन्हा दाखल करून घेतला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर करीत आहेत. गुन्ह्यातील आठ आरोपींवर भारतीय दंड संहिता 500,34 आणि अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(क्यू) खाली नोंद करण्यात आला असून गुन्हा दाखल असलेल्या कोणालाही पोलिसांनी अटक केलेली नाही

 

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही