अलिबाग:

 रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोअरने आयोजित केलेल्या  एका ऑन लाईन पदग्रहण समारंभात रो.डॉ.किरण नाबर यांनी मावळते अध्यक्ष रो.जगदिश राणे यांचेकडून अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

  रो.निमिष परब यांनी रो.दिलीप  भड यांचेकडून कार्यवाह पदाचा तर रो.डॉ.राजेंद्र चांदोरकर यांनी रो.डॉ.किरण नाबर यांचेकडून खजिनदारपदाचा  पदभार स्वीकारला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.सुबोध जोशी उपस्थित होते. तसेच मान्यवर माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.डॉ.दीपक पुरोहीत , सहाय्यक गव्हर्नर रो.विलास कावणपुरे , रोटरी क्लब ऑफ पनवेलचे माजी अध्यक्ष रो. डॉ. दीपक कुलकर्णी  व रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोअरसाठीचे  गव्हर्नरचे प्रतिनिधी रो.डॉ.दीपक खोत  उपस्थित होते.

 नूतन अध्यक्ष रो.डॉ.किरण नाबर यांनी या वेळी क्लब तर्फे बेलोशी गावात एक मासिक मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर सुरु करण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच समाजातील विविध घटकांसाठी वैद्यकीय तपासणी शिबीर, शालेय विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व इतर आरोग्यविषयक विषयांवर ऑन लाईन व्याख्याने, नागरिकांसाठी आरोग्यविषयक व्याखाने, परिसर स्वच्छता य गोष्टींना प्राध्यान्य  दिले जाईल असा मनोदय व्यक्त केला. यावेळी माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. सुबोध जोशी,तसेच रो.डॉ.दीपक पुरोहीत तसेच माजी अ रो.डॉ.दिपक खोत यांनी नवीन पदाधिकार्यांना योग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सौ.राजश्री चांदोरकर तर आभार प्रदर्शन खजिनदार तसेच पुढील वर्षाचे अध्यक्ष रो.डॉ.राजेंद्र चांदोरकर यांनी केले.

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....