खोपोली 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जारी असल्याने सर्वच खाजगी शिक्षण संस्थांनी पालकांना पाल्याची शैक्षणिक फी भरण्यासाठी सक्ती करु नये,असे आवाहन मनसेतर्फे शाळा व्यवस्थापनाला करण्यात आलेले आहे.

 कारमेल स्कूल मधून अनेक पालकांना प्रवेश निश्‍चित करण्यासाठी दोन जून पर्यंत फी भरण्यासाठी फोन येताच पालकांच्या पायाखालची वाळू सरकली असून बहुसंख्य पालकांनी खालापूर तालुका अध्यक्ष सचिन कर्णूक, खोपोली शहर महाराष्ट्र अनिल  मिंडे यांच्याशी संपर्क साधत परिस्थिती सांगितल्यावर मनसे पदाधिकार्‍यांनी  कारमेल स्कूलचे प्रशासन प्राचार्य, मुख्याध्यापिका यांची भेट घेऊन त्यांना पत्र देत शालेय फी भरण्यासाठी पालकांना सक्ती करू नका असे आवाहन केले.

 कारमेल स्कूलचे प्रशासन प्राचार्य, मुख्याध्यापिका यांची भेट घेत लोअर केजी एलकेजी मध्ये प्रवेश घेतलेल्या पाल्यांच्या पालकांना दिनांक 2 जून पर्यंत फी भरण्याची सक्ती केली आहे ती करू नये. त्यांचे प्रवेश रद्द करू नये तसेच टाळेबंद काळ असल्या कारणाने अनेक पालकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्याकडून जून जुलै नंतर टप्प्याटप्प्याने फी घ्यावी असे निवेदपत्र दिले .

  या मागणीला कारमेल शाळा व्यवस्थापकांनी सकारात्मक भूमिका दाखविली असल्याचे अनिल मिंडे यांनी बोलताना सांगितले असून आपण आपले प्रवेश निश्‍चित असल्याचे मात्र कारमेल स्कुलच्या प्रशासनास कळवावे तसेच पालकांनी काही अडचण असल्यास मनसे  खोपोली शहर अध्यक्ष अनिल मिंडे मो.नं992166888 ,खालापुर तालुका अध्यक्ष सचिनजी कर्णुक 9518574903 यांच्याशी संपर्क साधा असे अवाहन केले आहे.

अवश्य वाचा