Wednesday, December 02, 2020 | 10:59 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

कागदोपत्री आरोग्य खात्याचे सर्वेक्षण आणि औषध वाटपाचा दावा;
रायगड
21-Nov-2020 09:13 PM

रायगड

अलिबाग  

कोरोनानंतर रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात लेप्टो स्पायरोसीसची लक्षणे आढळत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना झोपेतच असलेल्या जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाला कृषीवलच्या बातमी नंतर जाग आली. त्यामुळे आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी आरोग्य विभागाने कागदी घाडे नाचवत सर्वेक्षण केल्याचा दावा केला आहे. तसेच डॉक्झिसायक्लिनचे वाटप सुरु केल्याचेही म्हटले आहे. प्रत्यक्षात कृषीवलने संपर्क साधला असता अनेक गावांतील ग्रामस्थापर्यंत सर्वेक्षण करणारे आरोग्य सेवक पोहचलेच नसल्याचे उघड झाले आहे. तर डॉक्झिसायक्लिन देखील मिळालेले नाही असेही ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे आरोग्य विभागाचा बेजबाबदारपणा दिसून येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

अलिबाग तालुक्यातील तीन गावात लेप्टो स्पायरोसीसची लक्षणे असणार्‍या रुग्णांच्या मृत्यूनंतर देखील झोपेतच असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेला कृषीवलने दणका दिला. त्यांनतर जाग आलेल्या आरोग्य विभागाने सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे. अलिबाग तालुकयातील पोयनाड, चिखली, पेढांबे, धोकवडे आणि रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत 2 लाख 22 हजार 416 लोकसंख्या असलेल्या परिसरासाठी 30 हजार 600 डॉक्झिसायक्लिनचा साठा प्राप्त झाला असून त्यापैकी उपके्ंरदांना 15 हजार 760 डॉक्झिसायक्लिनचे वाटप करण्यात आले आहे. तर 14 हजार 880 डॉक्झिसायक्लिनचा साठा शिल्लक आहे. 1 हजार 641 प्रतिबंधात्मक व्यक्तींना  5 हजार 260 डॉक्झिसायक्लिनचे वाटप करण्यात आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

तर पेण तालुक्यात गडब, वाशी, जिते, कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत 1 लाख 33 हजार 594 व्यक्तींना 7 46 हजार 814 डॉक्झिसायक्लिनचे वाटप करण्यात आल्याचे पेण तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

कृषीवलने अलिबाग तालुक्यात काही ग्रामपंचायती तसेच गावांमध्ये संपर्क साधला असता नागाव वगळता कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण झाले नसल्याचे अनेकांनी सांगितले. काही ठिकाणी गोळया आरोग्य सेवकांपर्यंतच पोहचल्या आहेत. मात्र अजूनही वाटप झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फक्त सारवासारव करण्यासाठी आरोग्य विभाग कागदी घोडे नाचवित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top