अलिबाग,

    जुईबापूजी येथील तब्बल 1.84 हेक्टर क्षेत्रावर जेएसडब्ल्यु या बलाढ्य कंपनीने अतिक्रमण करून तेथील कांदळवनांचा -हास केला आहे. याबाबत जिल्हाधिका-यांनी कारवाई करावी, असे आदेश कोकण आयुक्तांनी दिले आहेत.

अलिबाग येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी शासनाकडे दाखल केलेल्या अनेक तक्रारीनंतर कोकण आयुक्तांनी 26 मे रोजी जिल्हाधिकारी रायगड यांना सावंत यांचा तक्रार अर्ज पाठवून कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती सावंत यांनी दिली आहे. त्याच सोबत  येत्या दोन महिन्यात मुंबई शहर, उपनगर, रायगड, पालघर, ठाणे येथील विविध सरकारी विभागांनी आपल्याकडील कांदळवनांच्या जमिनी वन विभागाकडे हस्तांतरित करण्याचे तसेच कांदळवन नष्ट झालेल्या जमिनीही वन विभागाच्या ताब्यात देण्यासंदर्भात आदेश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 19 सप्टेंबर रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले आहेत.

  त्यामुळे जेएसडब्ल्यू कंपनीने  कनव्हेअर बेल्टसाठी सिमेंट काँक्रिटचे फाउंडेशनचे काम हि सर्व बांधकामे शासनाच्या कांदळवन नष्ट झालेल्या जमिनीही वन विभागाच्या ताब्यात देण्याच्या निर्देषांमुळे वनविभागाच्या ताब्यात जाणार आहेत. या अनधिकृत वनेत्तर बांधकामांसाठी वन विभागाने यापूर्वीची कंपनीवर वन कायदयान्वये गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती सावंत यांनी दिली आहे.

 निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या पत्राची प्रत मिळताच सावंत यांनी सदरच्या पत्रामध्ये ठोस कारवाई करण्याबाबत संदिग्धता असल्याची तक्रार  राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

याबाबत माहिती अधिकारामध्ये कोकण आयुक्तांकडे या जमिन खरेदी परवानगीची प्रत मागीतली असल्याची माहितीही सावंत यांनी दिली आहे.  

कोकण आयुक्तांच्या पत्राबाबत अलिबागच्या प्रांताधिकारी यांचा अहवाल मागवला आहे. या प्रकरणी त्यांना कार्यवाही करण्यास आदेशीत केले आहे, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल अशी प्रतिक्रीया  निवासी उप जिल्हाधिकारी, रायगड पद्मश्री बैनाडे यांनी माध्यमांना दिली आहे.

अवश्य वाचा