Wednesday, December 02, 2020 | 12:30 PM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

दिवेआगरचे सुवर्ण गणेश मंदिर भाविकांसाठी खुल
रायगड
21-Nov-2020 06:26 PM

रायगड

श्रीवर्धन  

दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिर पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. परंतु पर्यटकांना प्रवेश करताना सॅनिटायझर लावणे बंधनकारक असून चेहर्‍याला देखील मास्क आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कोरोना संबंधीच्या सर्व उपाययोजना काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन देवस्थान न्यासातर्फे भाविकांना करण्यात आले आहे.तशा आशयाचा फलक मंदिराबाहेर लावण्यात आला आहे.   दर्शनासाठी जाताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे बंधनकारक आहे.

सुवर्ण गणेश मंदिर व हरिहरेश्‍वर येथील हरिहरेश्‍वर व काळभैरव मंदिर पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्याने श्रीवर्धन तालुक्यात सध्या पर्यटक खूप मोठ्या प्रमाणावर येत आहेत. लॉकडाउन व चक्रीवादळ यामुळे नुकसानग्रस्त झालेले पर्यटन व्यावसायिक पर्यटक येऊ लागल्यामुळे समाधान व्यक्त करत आहेत.

राज्यातील मंदिरे प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत शासनाकडून आदेश निघाल्यानंतर दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिर खुले करण्याचा निर्णय देवस्थान न्यासातर्फे घेण्यात आला  सॅनिटायझर, मास्क याचा वापर करून मंदिरामध्ये भाविकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करून प्रवेश दिला जात आहे.अशी माहिती सरपंच उदय बापट यांनी दिली.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top