अलिबाग

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्येत मोठया प्रमाणावर वाढ होत असून साडेतीन हजार रुग्णसंख्येवर पोहचलेल्या रायगड जिल्ह्यात आज नव्याने 234 रुग्णांची नोंद झाल्याने पुन्हा एकदा विक्रमी वाढ दिसून येत आहे. तर दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्यूंची संख्या देखील 133 वर गेली आहे. दिवसभरात 113 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्यांची संख्या 2195 वर गेली असून आतापर्यंत 1355 जणांवर उपचार सुरु आहेत.

सोमवारी नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 131, पनवेल ग्रामीण 50, उरण 5, खालापूर 7, कर्जत 5, पेण 9, अलिबाग 4,  मुरुड 2, तळा 1, माणगाव 11, रोहा 4, श्रीवर्धन 2, महाड 1, पोलादपूर 2 असे एकूण 234 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर पनवेल मनपा क्षेत्रातील 4 उरणमधील एक अशा पाच रुग्णांचा मृत्यू झाला. अंतिम रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने कोरोनामुक्त झाल्याचे घोषीत करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये पनवेल मनपा 61, पनवेल ग्रामीण 7, उरण 4, खालापूर 0, कर्जत 18, पेण 1, अलिबाग 13, रोहा 2, श्रीवर्धन 1, पोलादपूर 6 असे एकूण 113 रुग्णांना घरी सोडण्यात आले.