Thursday, December 03, 2020 | 12:53 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

हरवित प्राथमिक शाळेला शालेय साहीत्य वाटप
रायगड
28-Oct-2020 07:16 PM

रायगड

बोर्ली प़ंचतन

 सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुरस्कृत सह्याद्री विद्यार्थी अकादमी श्रीवर्धन यांच्यावतीने एक पाऊल शिक्षणाकडे या उपक्रमाअंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील हरवीत येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील ईयत्ता पहीली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना बुधवार दि.28 ऑक्टोबर 2020 रोजी शारीरीक अंतराचे योग्य ते पालन करुन स्वाध्याय पुस्तके तसेच विवीध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

  सह्याद्री विद्यार्थी अकादमी गेली चार वर्षांपासून संपुर्ण महाराष्ट्रभर गरजु विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठी हा उपक्रम राबवीत आहे.मुलांच्या चेहर्‍यावर साहित्य मिळाल्यानंतर दिसणारा आनंद हीच आमच्या कामाची पावती असल्याची भावना अकादमीच्या सदस्यांनी यावेळी व्यक्त केली.

  कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ललिता पवार, सदस्य शितल पवार, दिघी केंद्रप्रमुख गोविंद खरगावकर सर, मुख्याध्यापक जनार्दन जाधव सर, मनोज गावित सर,तसेच सहयाद्री विद्यार्थी अकादमीचे प्रयोग किर, ऐश्‍वर्य विलणकर, सर्वेश विलणकर, स्नेहल विलणकर, दिव्या विलणकर,सोहम विलणकर,श्रीतेज नांदविडकर,मनिष मोरे हे उपस्थित होते.यावेळी सहयाद्री विद्यार्थी अकादमीला सहकार्य करणार्‍या सर्व सहकार्यांचे संस्थेचे सदस्य प्रयोग किर यांनी विशेष आभार मानल

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top