अलिबाग 

मिनिडोअर चालक मालक संघटना कार्लेखिंड अलिबाग यांच्या सभासदांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूच्या प्रदुभावाने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दोन महिने रिक्षा पूर्णतः बंद ठेवण्यात आल्या होत्या. मार्च एप्रिल मे हे महिने पावसाळ्यापूर्वी खरेदीचे व लग्नसराईचे दिवस असल्याने मिनिडोअर रिक्षा यांच्या धंद्याचे दिवस असतात. या कमाईवरच पुढचे महिने अवलंबून असतात.

लॉकडाऊनमुळे मिनिडोअर रिक्षावाल्याचे पूर्ण जीवऩ विस्खळीत होवून उपासमार होऊ लागली, हे वृत्त राजाभाऊ ठाकूर, व अमित नाईक यांना कळताच त्यांनी मिनिडोअर चालक मालक संघटना कार्लेखिंड यांच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून संसारउपयोगी 18 वस्तूचे पॅकेज असे 120 पॅकेज वाटप सभासदांना सारळ ग्राम पंचायत सरपंच अमृता नाईक,  सत्यवान ठाकूर , संघटनेचे सल्लागार अ‍ॅड रत्नाकर पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी मिनिडोअर चालकमालक संघटना कार्लेखिंडचे पदाधिकारी उपध्याक्ष विकास पाटील, दिनेश पाटील, ओमसाई , जितेंद्र पाटील, सचिन म्हात्रे इत्यादी उपस्थित होते. आपत्तीच्या काळात अमित नाईक व राजाभाऊ ठाकूर यांनी जी मदत केली त्याबद्दल सर्व सभासदांनी व त्यांच्या कुटुंबियांनी आभार मानले.

 

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!