पेण  

गृह विभागाच्या परिपत्रकानुसार जिल्हास्तरावर जिल्हा शांतता समितीवर अशासकिय सदस्यांची नियुक्ती पालकमंत्र्यांच्या शिफारसीनुसार करण्यात आली आहे. मात्र, या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यात नाराजीचा सूर उमटत आहे.

दरम्यान, जिल्ह्यात व्यक्त होणारी नाराजी दूर करण्यासाठी समिती सदस्यांच्या नावांच्या दोन याद्या प्रशासनाला प्रसिध्द कराव्या लागल्या आहेत. पहिली यादी दि. सहा ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानंतर दुसरी यादी दि. नऊ ऑगस्टला प्रसिध्द करण्यात आली. पहिल्या यादीत समावेश असलेली नावे प्रसिध्द झाल्याने एकंदरीत जिल्हयात नाराजीचा सूर उमटत होता. म्हणून 9 ऑगस्ट रोजी पुन्हा दुसरी यादी प्रसिध्द करण्यात आली. पहिल्या यादीमध्ये 15 तर दुसर्‍या यादीमध्ये 23 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र पालकमंत्र्यांनी 5 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे जी यादी दिली होती त्यामध्ये एकुण 40 जणांची शिफारस केली होती. मात्र नियुक्त्या होताना 38 जणांची नियुक्ती झाल्याने दोनजण नाराज आहेत. त्यातच शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना या नियुक्तांपासुन डावलण्यात आल्याने  शिवसैनिक नाराज आहेत. जिल्हयाच्या 38 जणांच्या नियुक्तीमध्ये प्रसारमाध्यमांचा एकही प्रतिनिधी नसल्याने जिल्हयातील प्रसार माध्यमांसाठी काम करणार्‍या संघटनांचे प्रतिनिधी देखील नाराज आहेत. एकंदरीत जिल्हा शांतता कमिटीच्या नियुक्तीमुळे शांततेपेक्षा अशांतताच जास्त आहे असेच म्हणावे लागेल.

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन