माणगाव 

माणगाव तालुक्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील माणगाव - मोर्बा,माणगाव - बामणोली,माणगाव - निजामपूर, लोणेरे - गोरेगाव, दहीवली - वडवली, इंदापूर - तळा आदी सर्वच प्रमुख रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

तालुक्यातील लाखपाले गावाजवळ  मुंबई - गोवा महामार्गावर मंगळवार दि.4 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 4 वा.एक भला मोठा वडाचा झाड कोसळला. हा झाड जवळच्या एका घरावरही पडला.मात्र या घरातील लोकांनी वेळीच दक्षता बाळगून ते घराबाहेर पडले होते अन्यथा दुर्घटना घडली असती.हे झाड रस्त्यावर पडल्याने  मुंबई - गोवा महामार्ग ठप्प झाला होता.महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.रात्री उशिरा पर्यंत हा महामार्ग खुला झाला होता.हा झाड  हटविण्याचे काम राष्ट्रीय बांधकाम खात्याकडून युद्धपातळीवर सुरू होते. मुसळधार पावसाने माणगाव काळनदी तुडुंब भरून वाहत असून तिने धोक्याची पातळी ओलांडली आहे.सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने माणगावशी जवळपास 200 हून अधिक गावांचा संपर्क गेल्या दोन दिवसांपासून तुटला असल्याने माणगाव शहरातील बाजारपेठ सूनिसूनी वाटत आहे.मुसळधार पावसाचा जोर पाहता तालुक्यातील नागरिकांनी अतिदक्षता बाळगावी असे आवाहन तालुक्याच्या प्रांताधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी केले आहे.

 

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही