Wednesday, May 19, 2021 | 01:55 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

जलजीवन योजनेसाठी महाडमध्ये अडचणी
रायगड
12-Apr-2021 07:53 PM

रायगड

 

। महाड । प्रतिनिधी ।

मार्च, एप्रिल महिना आल्यानंतर सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. वास्तविक शासनाकडून गेल्या अनेक वर्षापासुन पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. गावागावातुन पाणी योजना राबविण्यात येत आहे असे असले तरी पाणी टंचाईचा प्रश्‍न सोडविण्यात अपयश येत आहे. काही गावातुन योजनांची नावे बदलुन नव्याने योजना राबविल्या जात आहेत. महाड तालुक्यामध्ये जलजीवन योजना राबविण्यास सुरूवात करताना गावांतील लोकसंख्या आणि योजनेचा खर्च याचा ताळमेळच बसत नसल्याने योजना राबविण्यात नवीन अडचणी निर्माण होत आहेत. सदरची योजना राबविण्याचे महाड तालुक्यातुन 53 तर पोलादपुर तालुक्यातुन 27 प्रस्ताव तयार करण्यात आले असल्याची माहिती महाड येथील ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता प्रशांत म्हात्रे यांनी दिली.

शासनाकडून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना कोट्यावधी रुपयांचा निधी दरवर्षी खर्च करण्यात येतो, तरीही सर्वत्र पिण्याच्या पाण्याची समस्या कायम स्वरुपी असल्याचे दिसुन येते. बदलत्या सरकारकडून नवीन योजना राबविण्यात येतात अश्याच प्रकारे सध्या जलजीवन मिशन ही योजना राबविण्यासाठी पाणी पुरवठा विभाग व्यस्त आहे. राष्ट्रीय पेयजन योजना जलजीवन मिशनमध्ये समाविष्ट करण्यात येऊन टंचाईग्रस्त गावांमध्ये ङ्गहर घर नलसे जलफ असे ब्रिदवाक्य घेऊन ही योजना राबविण्यात येत आहे. महाड तालुक्यामध्ये जी गावे टंचाईग्रस्तमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत, त्या गावांमध्ये या पुर्वी विविध योजना राबविण्यात आलेल्या असल्या तरी गावागावातील टंचाई कमी झालेली नाही. ग्रामिण पाणी पुरवठा विभागाने पुन्हा जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे 66 प्रस्ताव मंजुरी करीता पाठविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. 

एखाद्या गावांमध्ये जलजीवन मिशन योजना राबविण्या पुर्वी त्या ठिकाणचा प्रोजेक्ट तयार करण्यात येणार आहे. यामध्ये गावातील पाण्याचा स्त्रोत, त्याचे अंतर इत्यादीचा बारकाईने अभ्यास करण्यात येणार आहे. परंतु महाड तालुक्यामध्ये सदरची योजना राबविण्यामध्ये अनेक अडचणी समोर येत आहेत. तालुक्यातील बहूतांशी गावे डोगरांवर तसेच दुर्गम भागात असल्याने अनेक तांत्रिक अडचणी समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

जलजीवन मिशन योजना राबविण्यासाठी महाड तालुक्यातुन 53 आणि पोलादपुर तालुक्यातुन 27 प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. या योजनेतुन गावातील प्रत्येक घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा करता येणे शक्य असुन योजनेचा खर्च अधिक होणार आहे.

 प्रशांत म्हात्रे, प्रभारी कार्यकारी अभियंता

ग्रामिण पाणी पुरवठा विभाग

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top