अलिबाग 

श्रावणातील वद्य अष्टमीची रात्र म्हणजे तमाम श्रीकृष्ण भक्तांसाठी एक आनंदाची पर्वणीच असते.कारण दरवर्षीप्रमाणे या दिवशी मध्यरात्री सार्‍यांचा लाडका कान्हा,कन्हैय्या,नंदकिशोर अशी विविध नामधारण करुन पृथ्वीवर वावरणार्‍या भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव.गेली अनेक शतके मोठ्या भक्तीभावाने साजरा होणार्‍या या कृष्णजन्मोत्सवाचा सोहळा यावर्षी रंगलाच नाही. कोरोनाच्या धास्तीने कृष्ण कधी जन्मला हे कुणालाच कळलेच नाही.

कोरोनाचा   सर्वत्र कहर झालाय.दररोज शेकडोजणांचे प्राण जात असून,हजारोजण बाधित होत आहेत.त्या पार्श्‍वभूमीवर सरकारने सर्वच धार्मिक सण,उत्सवांवर बंदी घातली आहे.फक्त परंपरा जपण्यासाठी मोजक्याच उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत सण,उत्सव साजरे करण्यास अनुमती दिली आहे.यामुळे मार्चपासून देशातील सर्वच धर्मियांचे सण,उत्सव साधेपणाने साजरे होत आहेत.त्यामुळे यावेळी श्रीकृष्ण जन्मोत्सवही असाच साधेपणाने साजरा झाला.ना कुठे कान्हाची ती प्रेमळ गीते कानावर पडली ना,कुठे भजनाचे स्वर कुठल्याच मंदिरात घुमले.केवळ परंपरा जोपासण्यासाठी जन्मोत्सवाचा सण साधेपणाने साजरा करण्यात आला.अनेक मंदिरात जन्मोत्सवानिमित्त दहीहंड्या फोडण्याची परंपरा आहे.पण यावेळी ती सुद्धा खुंटली.

आता बुधवारी साजरा होणारा दहीहंडीचा उत्सवही असाच शांतपणे साजरा केला जाणार आहे. ना गोविंदाची धामधूम कुठे पहावयास मिळणार, ना उंच हंड्याच थरार नसणार.केवळ औपचारिकता म्हणून हंड्या बांधून त्या फोडल्या जातील.

 

अवश्य वाचा