पनवेल 

 पनवेल महानगरपालिका हद्दीत निर्जंतुकीकरण व मच्छरधूर फवारणी करण्याची मागणी शहर शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिले आहे.

पावसाळा सुरू होऊन जवळजवळ 20 ते 25 दिवस उलटून गेले आहेत. तसेच पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता निम्म्याहून लोक घाबरून आजार लपवत आहेत. हे आजार काही वेगळे नसून दरवर्षी पावसाच्या साचलेल्या पाण्यातून निर्माण झालेल्या मच्छरांमुळे उद्भवलेले साथीचे आजार आहेत. महानगरपालिका दरवर्षी निर्जंतुकीकरण फवारणी करीत असते. यावेळी संकट दुप्पट असताना फवारणीसाठी विलंब होत आहे. हे सरळ सरळ नागरिकांच्या जीवाशी खेळ चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी या नागरी प्रश्‍नावर प्रशासनाने लक्ष घालून तातडीने निर्जंतुकीकरण फवारणी व मच्छरधूर फवारणी लवकरात लवकर करावी अशी मागणी केली आहे.

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....