Thursday, December 03, 2020 | 12:58 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

करंजा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर कारवाईची मागणी
रायगड
25-Oct-2020 05:25 PM

रायगड

जेएनपीटी 

जेएनपीटी परिसरात करंजा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डासोबत सन 2009 साली केलेल्या करारानुसार काम पूर्ण न केल्यामुळे व त्या अनुषंगाने शासनाचे आर्थिक नुकसान केल्याबद्दल संबंधित कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. 

याबाबत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांना मनसेचे सरचिटणीस संजय नाईक यांनी निवेदन दिले. उरण तालुक्यातील समुद्र किनार्‍यावर करंजा इन्फ्रास्ट्रक्चरकडून करंजा टर्मिनल बंदराची उभारणी करण्यात येत आहे. या बंदरामुळे पारंपरिक मासेमारी करणारा कोळी आगरी समाजाचा व्यवसाय धोक्यात येणार असल्याने येथील बांधवांनी न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. या परिसरातील आगरी, कोळी बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी मनसेकडे मागणी केली. 

त्यानुसार नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संजय नाईक यांनी मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांची मुंबईत भेट घेऊन करंजा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने उरण तालुक्यातील बंदरामुळे बाधित ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी केली. यावेळी  राहुल गोडसे, शेखर जाधव, अमोल तांबे, सत्यवान भगत आदी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top