अलिबाग  

महाराष्ट्र कोषागार नियम व शासन निर्णयातील तरतुदीनुसार राज्य शासनाने निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी दि.01 नोव्हेंबर रोजीचा हयातीचा दाखला दि.01 ते दि.30 नोव्हेंबर या कालावधीत कोषागार कार्यालय सादर करावा लागतो. सद्य:स्थितीत कोविड-19 विचारात घेता राज्य शासनाने निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास दि. 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तरी सर्व निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचा दाखला सादर करण्याबाबत झालेल्या या बदलाची नोंद घ्यावी व त्याप्रमाणे दि. 31 डिसेंबर 2020 पर्यंत हयातीचा दाखला कोषागारात सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. फिरोज मुल्ला यांनी केले आहे.

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त