Thursday, December 03, 2020 | 12:35 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

दत्तात्रय पेडणेकर यांचे निधन
रायगड
27-Oct-2020 05:40 PM

रायगड

अलिबाग  

नागाव खारगल्ली येथील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते दत्तात्रय गोपाळ पेडणेकर यांचे  21 ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. भंडारी विकास मंडळ ,खार मुंबईचे ते संस्थापक अध्यक्ष होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी फ्री प्रेसमध्ये हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत तर नंतरच्या काळात दैनिक नवशक्तीसाठी अक्षर जुळणी विभाग आणि पत्रकार म्हणून काम पाहिले. विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदाची जबाबदारीही त्यांनी अनेक वर्ष सांभाळली. माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक सदानंद वर्दे यांचे विश्‍वासू कार्यकर्ते म्हणूनही ते ओळखले जात. यादरम्यान त्यांचे अनेक दिग्गजांशी जवळचे संबंध आले. याचा उपयोग त्यांनी आपल्या समाज बांधवांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी केला. अतिशय प्रेमळ आणि सहकरी वृत्तीच्या अण्णांचा गावातून मुंबईत आलेल्या प्रत्येक ग्रामस्थाला नेहमीच आधार वाटे. त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुलगे,तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top