पेण  

दहावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी दाखले मिळविणार्‍यांची तहसील कार्यालय आणि सेतूमध्ये गर्दी होत आहे. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे दिसते.

मार्च महिन्यापासून तहसिल कार्यालयाचे कामकाज पूर्ण कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत होत नसल्याने आणि दाखल्यांचे काम बंद असल्याने नुकताच जाहीर झालेल्या दहावी बारावीच्या निकालामुळे दाखल्या बाबत पालकवर्गामध्ये अनेक समज गैरसमज आहेत. पुढील शैक्षणिक कामासाठी दाखले मिळावेत म्हणुन गेल्या आठवडाभरापासून तहसिल कार्यालयात विद्यार्थ्याची व पालाकांची वर्दळ वाढली आहे. त्यातच सेतु कार्यलयाचे काम राम भरोसे सुरू असल्याने ज्या वेगाने दाखल्यांची कामे व्हायला पाहिजे त्या वेगाने होत नाहीत. नागरिकांची गर्दी होत असून तहसिल कार्यालयात सोशल डिस्टसिंगच्या नियमाचे उल्लंघन होत आहे.

एकतर पेण तालुक्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दाखल्यांसाठी होत असलेली गर्दी ही प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. त्यातच पालकवर्ग व विद्यार्थ्याची गर्दी तहसिल कार्यालयात होत असताना अनेकांनी आपली वाहन तहसिल कार्यालयाच्या मोकळ्या जागेत पार्क करून ठेवल्याने दाखल्यांसाठी येणार्‍या नागरिकांचे हाल होत आहेत. खर्‍या अर्थाने प्रशासनाने दाखल्यासंदर्भात तलाठयांमार्फत गावो गावी कॅम्प घेतल्यास कोरोनाचा धोका ही टाळता येईल व सर्व सामान्यांना दाखले ही उपलब्ध होतील. तरी याकडे तहसीलदारांनी तातडीने लक्ष घालावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन