उरण 

उरणला लवकरच कोव्हीड हॉस्पिटल सुरू होणार असून,सिडको प्रशासनाने तातडीने कार्यवाही देखील सुरु केली आहे.

   मंत्रालयात नगरविकास मंत्री  एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी तातडीने आदेश देताच सिडकोच्या अधिकारी वर्गांनी शनिवारी पहाणी करून पुढील कार्यवाही सुरू केली. त्यामुळे येत्या काही दिवसांत उरणमध्ये कोव्हीड हॉस्पिटल लवकरच सुरू होणार असल्याची माहिती माजी आमदार मनोहरशेठ भोईर व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी दिली.

 उरणच्या  इतर समस्यांबरोबर कोरोनाच्या महामारीत उरणमध्ये प्रामुख्याने कोव्हीड हॉस्पिटल नसल्याने कोरोना रुगणांना पुढील उपचारासाठी उरण बाहेर हलवायला लागतो. त्यामुळे रुग्णांचा जीव जाण्याच्या घटना घडल्या आहेत. तरी उरणमध्ये कोव्हीड हॉस्पिटल त्वरित सुरू करण्याची मागणी लावून धरली होती. याची मंत्री महोदयांनी त्वरित दखल घेऊन सिडकोला कोव्हीड हॉस्पिटल सुरू करण्याचे आदेश दिले होते.

 बैठकीत दिलेल्या आदेशानुसार आज सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उरण परिसरातील सिडको कडून अद्यावत 100 बेडचे कोव्हीड हॉस्पिटल उभारण्याकरिता बोकडविरा येथील सिडको प्रशिक्षण केंद्र व केअरपॉइंट रुग्णालयाची प्रत्यक्ष  पाहणी करून ज्या उणीवा आहेत त्याबाबत सिडकोच्या अधिकार्‍यांना तात्काळ पाहाणी करून त्याचा अहवाल त्वरीत सादर करणे बाबत आदेश दिला होता.  त्याप्रमाणे  पहाणी करण्यात आली.

सध्या उरण पनवेल येथे कोरोना या माहामारीचे वाढते रुग्ण पहाता येथे 100 बेडचे कोव्हीड सेंटर 20 आसीयु बेड व्हेंटीलेटरसहित हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु करण्यात येणार आहे.   कोव्हीड हॉस्पिटल सर्व नागरिकांसाठी खुले करण्यात येईल असे आश्‍वासन यावेळी देण्यात आले.     यावेळी  बबनदादा पाटील,   माजी आमदार मनोहर भोईर,   प्रशांत पाटील, सिडकोचे डॉ.बाविस्कर,  मिलिंद पाडगावकर,  डॉ. मनोज भद्रे,  संतोष पवार, किरीट पाटील,  राजेंद्र मढवी सर, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

अवश्य वाचा