पाली / वाघोशी 

पाली बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांची गर्दी वाढू लागल्याने कोरोनाचा आणखी प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.

 वारंवार बाजारपेठ बंद ठेवल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सुधागड तालुक्यात मागील एक महिन्यापासून पाली बाजारपेठ तीन वेळा तीन दिवसासाठी बंद ठेवण्यात आली होती. यामुळे येथील ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. रोज घरी दहा ते वीस रुपयात सामान नेणारी आदिवासी व गरीब कुटुंबातील लोकांना तर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती. सुधागड तालुक्याची पाली ही मुख्य बाजारपेठ आहे. तालुक्यातील खेड्यापाड्यातून नागरिक येथे खरेदीसाठी येत असतात मात्र देशात आलेल्या कोरोना साथीमुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती.  तरीही जीवनावश्यक वस्तूचे जसे किराणा मेडिकल भाजी दूध वगैरे दुकान चालू होते यामुळे नागरिकांच्या उदरनिर्वाह याबद्दल विशेष फरक पडत नव्हता मात्र पाली बाजारपेठ मनमानी करत मागील महिन्याभरात तीन वेळा तीन दिवस कडकडीत बंद ठेवल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

 तीन दिवसाचा बंद उठवल्यानंतर सुधागड तालुक्यातील पाली बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी केली. तालुक्यातील नागशेत येथे काही दिवसापूर्वी कोरोणाचा रुग्ण सापडल्याने संपूर्ण तालुका हादरला होता. त्याच पार्श्‍वभूमीवर तालुक्याचा केंद्र असलेली पाली बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवण्यात आली होती. तीन दिवसाचा कडकडीत बंद च्या नंतर उघडलेल्या बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांनी तोबा गर्दी केली. आणि यामुळे सोशल डिस्टेंस फज्जा उडाला आहे. आजारापासून बचाव करण्यासाठी शासनाने योजलेल्या उपाययोजना जनता मनावर घेत नसल्याने आणि वारंवार बाजारपेठ बंद केल्याने ग्राहकांची झुंडच्या झुंड पाली येथे येत आहेत व त्यामुळे कोरोणा  वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. वारंवार बाजारपेठ बंद ठेवण्यात का आली होती

अवश्य वाचा