पाली/ वाघोशी

 सुधागड तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या पाली बाजारपेठेत होणारी गर्दी काही केल्या कमी होत नसल्याने तालुक्यावर कोरोणाच्या संकटाची टांगती तलवार उभी राहिली आहे. गर्दी हटेना आणि धोका टळेना. अशी अवस्था पाली बाजारपेठेची झाली आहे ही गर्दी कमी करण्यास तालुक्यातील प्रशासन अपयशी ठरत असल्याचे समोर येत आहे. तहसील कार्यालया कडून घेण्यात येणारी खबरदारी अपूर्ण ठरत आहे.

 गर्दी रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा देखील कुचकामी ठरत आहे. तर पाली ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातच ही बाजारपेठ असल्याने सर्वकाही जबाबदारीही पाली ग्रामपंचायतीची आहे मात्र त्यांनी आखून दिलेल्या नियमांचे कुठल्याही कुठल्याही दुकानदार अथवा ग्राहक पालन करीत नसल्याने धोका वाढत आहे . एकही दुकानाबाहेर त्यांनी सॅनिटायजर  अथवा हात धुण्याकरिता  साबण पाणी उपलब्ध नाही.  त्यामुळे कोणी हात धुवत नाहीत तसेच मास्क चा वापर देखील कमी प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. गर्दी कमी व्हावी व नियमांचे पालन व्हावे याकरिता शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत पाली ग्रामपंचायतीने काही काळ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई देखील केली होती. मात्र त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. उलट आता गर्दी वाढतच चालली आहे .शासनाच्या नियमांचे पालन कोणीही करताना दिसत नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास पालीकरांवर तसेच सुधागड वर कोरोणा चे संकट आल्याशिवाय राहणार नाही.