Friday, March 05, 2021 | 06:05 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

भिसेगाव ग्रामस्थ मंडळाकडून कोरोनायोद्ध्यांचा सन्मान
रायगड
23-Feb-2021 03:27 PM

रायगड

नेरळ | वार्ताहर

कर्जत शहरातील भिसेगाव येथील ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकजवळ शिवजयंती साजरी करण्यात आली. ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाकाळात चांगले काम करणार्‍या योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले.

भिसेगाव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने तेथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव साजरा केला गेला. त्यावेळी महाराजांच्या जीवनावरील पोवाडे आणि शिवारती तसेच शिवगर्जना करण्यात आली. त्यानंतर कोरोनाकाळात सेवा देणार्‍या या सर्व कोरोनायोद्ध्यांचा सन्मान सोहळा भिसेगाव ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने करण्यात आला. त्यात कोरोनाकाळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतः झोकून देणारे तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, आरोग्य कर्मचारी, पालिकेचे सफाई कर्मचारी, मेडिकल क्षेत्रात काम करणारे गावातील प्रतिनिधी आणि पत्रकार यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी स्थानिक नगरसेवक सोमनाथ ठोबरे, अमोघ कुलकर्णी यांनी शिवाजी महाराज जयंती नव्या उपक्रमातून साजरी करण्याची संकल्पना दिली होती. सूत्रसंचालन प्रेमनाथ गोसावी यांनी केले. मागील वर्षापासून कोरोना या महामारीने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. वाडीवस्तीवरील लोकांना धान्यवाटप केले. मेडिकल क्षेत्रात काम करणार्‍या तरुणांनी कोरोनाग्रस्त नागरिकांना घरपोच औषधे देणे, तसेच सॅनिटायझरची व्यवस्था यासाठी सहकार्य केले. गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावस्तरावर लॉकडाऊन घेतले. घरोघरी जाऊन जनजागृती केली. महिलांनी स्वतः मास्क शिवून त्याचे संपूर्ण गावात वाटप केले. गावातील लोकांना बाहेर जावे लागू नये याकरिता गावातच भाजीपाला आणून तो घरपोच करण्याची सेवा तरुणांनी दिली, त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top