Wednesday, May 19, 2021 | 01:53 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

गुढीपाडव्यावर कोरोनाचे सावट
रायगड
12-Apr-2021 08:16 PM

रायगड

 

। अलिबाग  विशेष प्रतिनिधी ।

हिंदू नववर्षावर अर्थात गुढीपाडव्यावर कोरोना महामारीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे सलग दुसर्‍या वर्षी गुढीपाडव्याच्या उत्साहावर कोरोनाचे सावट पसरले आहे. अर्थात, तरीदेखील घरोघरी गुढीपाडवा साजरा केला जाणार असला तरी तो साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले असून, त्यासाठी नियमावली जाहीर केली आहे.

लॉकडाऊनच्या शक्यतेमुळे आणि दोन दिवसांचा कडक लॉकडाऊन संपल्यानंतर बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. गुढीपाडव्यानिमित्त पारंपरिक वेशभूषेत तसेच शोभायात्रा, मिरवणुका व धार्मिक उत्सव आदींवर जमावबंदीमुळे गदा आली आहे. त्यामुळे यंदादेखील शांततेच गुढी उभारावी लागणार असल्याने जनता हिरमुसली आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनदेखील गर्दी होऊ नये याकडे लक्ष ठेवून आहे.राज्य सरकारने गुढीपाडवा सणाच्या पार्श्‍वभूमीवर नियमावली प्रसिद्ध केली आहे. नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. नियमावलीनुसार, सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करणे अपेक्षित आहे. शोभायात्रा, कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली, पालखी काढण्यास बंदी असणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असे सांगण्यात आले आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या मुहूर्तावर आवर्जून सोनेखरेदी केली जाते, परंतु कोरोना निर्बंधांमुळे सराफी पेढ्या बंद ठेवाव्या लागणार असल्याने व्यापार्‍यांनी ऑनलाइन खरेदी, दूरचित्र संवाद माध्यमातून विक्रीचे पर्याय अंमलात आणले आहेत; परंतु सोने ऑनलाइन खरेदी करण्याची मानसिकता नसल्याने व्यापार्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षभरात सण, सोने खरेदीचे मुहूर्त, लग्नसराई अशी सुवर्ण विक्रीची संधी सराफ बाजाराला साधता आली नाही. सोन्याचे दर काही दिवसांपासून कमी होऊ लागले आहे. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची व्यापार्‍यांना आशा होती. मात्र बाजारपेठ बंद असल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. अनेक व्यापारी ऑनलाइन पद्धतीने किंवा दूरचित्र संवाद माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. समाजमाध्यमांवर जाहिराती देऊन ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. सोन्यासह अन्य मौल्यवान धातूंचे दागिने आणि वस्तू विक्रीतील काही मोठ्या बँ्रड्सनी ऑनलाइन खरेदीचा पर्याय ग्राहकांना दिला आहे.

शासन निर्बंधाच्या अधिन राहूनच घरगुती वातावरणातच गुढीपाडवा साजरा करावा. नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग, जमावबंदीचे उल्लंघन करु नये. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

निधी चौधरी,

जिल्हाधिकारी, रायगड

काय आहे नियमावली

सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत साधेपणाने साजरा करा

मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी

सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त जण नको

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top