Tuesday, April 13, 2021 | 12:25 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

रोहा तालुक्यातील कोरोना सेंटर बंद
रायगड
07-Apr-2021 06:34 PM

रायगड

 

 

रोहा । वार्ताहर ।

काही दिवसांपूर्वी रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यरत असणार्‍या विविध कंपन्यांच्या माध्यमातून किल्ला येथील शेतकी कॉलेज मध्ये कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. पण सदर केंद्र बंद असल्याची माहिती समोर येत आहे.कोरोनाच्या वाढत्या पार्श्‍वभूमीवर किल्ला तसेच नागोठणे येथे कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. त्यापैकी किल्ला येथील सेंटर बंद करण्यात आले असून नागोठणे येथील केंद्र केवळ सुरू आहे.तालुक्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.यामुळे किल्ला येथील कोव्हीड केअर सेंटर तातडीने सुरू करणे गरजेचे आहे.महाड येथे स्थानिक औद्योगिक वसाहतीच्या सहकार्याने चालू करण्यात आलेले केंद्र देखील बंद असून सदर केंद्र सुरू करण्यास तेथील कारखानदार संघटनेने असमर्थता दाखवल्याची माहिती आहे.या पार्श्‍वभूमीवर रोहा येथील कोव्हीड सेंटर सुरू होणार का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top