Wednesday, May 19, 2021 | 01:59 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

एमजीएम हॉस्पिटलमध्ये कोरोना सेंटर
रायगड
02-May-2021 06:42 PM

रायगड

 | पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये आता पनवेल मनपासाठी कोरोना सेंटर सुुरु केले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी एम.जी.एम रुग्णालयाने  हापालिकेसाठी नविन 250 बेड कोव्हीड रुग्णांसाठी उपलब्ध करुन द्यावेत अशा प्रकारचा करार करावा म्हणून शेकाप आमदार बाळाराम पाटील  यांनी सर्व प्रथम पाठपुरावा केला होता. त्यासाठी पालकमंत्री. अदिती तटकरे यांची प्रत्यक्षात भेट घेऊन आरोग्यमंत्री. राजेश टोपे  ब व नगरविकास मंत्री. एकनाथ शिंदे यांना पत्रव्यवहार करुन सदर करारनामा लवकरात लवकर करावा अशी मागणी केली होती.

 सदर मागणी मान्य केली  म्हणून  एम.जी.एम हॉस्पिटलचे विश्‍वस्त डॉ. कदम  यांची शेकाप नेत्यांनी  भेट घेऊन चर्चा केली व त्यांचे आभारही मानले. सदर कामासाठी काहीही मदत लागत असेल तर ती आम्ही करु असे आश्‍वासन देखील दिले. यावेळी आमदार. बाळाराम पाटील, माजी.नगराध्यक्ष. जे.एम.म्हात्रे, विरोधी पक्षनेते. प्रीतम  म्हात्रे, शेकाप पालिका जिल्हा चिटणीस, नगरसेवक  गणेश दादा कडू उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top