माणगाव 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने हाती  घेतलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अंतर्गत आरोग्य आपल्या दारी मोहिमेला माणगाव नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांनी सहकार्य करा असे आवाहन नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष दिलीप जाधव यांनी केले आहे.

कोरोना महामारीने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला असून अनेकांचे प्राण या महामारीमुळे गेले आहेत.अलीकडच्या काळात सर्वत्र कोरोना विषाणूने कहर केला आहे.या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे माणगाव नगरीचे उपनगराध्यक्ष दिलीप जाधव यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना माणगाव नगरीतील नागरिकांना आवाहन केले आहे.त्यांनी सांगितले कोरोना महामारीचे वाढते संकट पाहून राज्य सरकारने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी  अंतर्गत आरोग्य आपल्या दारी मोहीम  हाती घेतली आहे.या मोहिमअंतर्गत आरोग्य खात्याचे अधिकारी, कर्मचारी हे घरोघरी येवून नागरिकांची आरोग्य तपासणी करून काही महत्त्वपूर्ण सूचना करणार आहेत. हे आरोग्य खात्यातील लोक आपल्या घरी येवुन यंत्राद्वारे तापमान व ऑक्सीजन तपासून आपल्याला इतर कोणते आजार असतील तर याची माहिती घेवून योग्य तो सल्ला देणार आहेत.या मोहिमेकडे माणगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांनी गांभीर्याने लक्ष देवून आरोग्य खात्याच्या लोकांकडून आपली तपासणी आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करून घेणे जरुरीचे आहे.कोणी याकडे दुर्लक्ष करून आपले आरोग्य धोक्यात आणू नका.आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच आपण सारेजण मिळून माणगाव नागरी कोरोनामुक्त करुया,असे आवाहन दिलीप जाधव यांनी केले आहे.

अवश्य वाचा