पोलादपूर 

 मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर चौपदरीकरणाच्या कामाने गती घेतल्यानंतर सद्यस्थितीत तास दोनतास संततधार झाल्यानंतर पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील प्रभातनगर पश्‍चिम या लोकवस्तीमध्ये पावसाचे पाणी तुंबून नागरिकांची तारांबळ उडत आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पोलादपूर शहरातील ग्रामीण रुग्णालयापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा इथपर्यंत दिसू लागले आहे. प्रभात नगर पश्‍चिम येथे सध्या दोन तासांपर्यंत झालेल्या संततधार अतिवृष्टीमुळे श्रीकाळभैरवनाथ मंदिराच्या मागील डोंगररांगांतून येणारे पावसाच्या पाण्याचे लोट शहराच्या पूर्वेकडे असलेल्या उत्तरवाहिनी सावित्री नदीच्या पात्रापर्यंत पोहोचण्यास मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा अडथळा झाला आहे. परिणामी, प्रभात नगर पश्‍चिम येथे नेहमीच काही काळ पूरस्थिती निर्माण होत आहे. या पुरकाळामध्ये प्रभातनगरमधील अनेकांचे बगिचे आणि व्हरांडे पाण्याखाली जात असून येथील अंतर्गत रस्तेही पुराखाली गायब होत आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत चौपदरीकरणाची मर्यादा स्पष्ट करण्यासाठी बांधण्यात आलेल्या काँक्रीट गटारांलगत असलेल्या खोल भागातून पाटाचे पाणी वाहू लागत असून काँक्रीट गटारांमध्ये हे पाणी शिरत नसल्याचे दिसून येत आहे. पूर्वीच्या महामार्गाच्या गटारांच्या रूंदीच्या अर्धी रूंदी काँक्रीट गटांरांची आणि अर्धी रूंदी खुल्या पाटाच्या पाण्याची अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे.

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद