आगरदांडा  

   कोरोना व्हायरसला हद्दपार करण्यासाठी मुरुड शहरातील अ‍ॅक्टीव्ह मेंबरच्या सदस्यांंनी पुकारलेल्या तीन दिवसीय जनता कर्फ्यूला दुसर्‍या दिवशीही  मुरुड शहरात  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्य बाजारपेठ, जुनीपेठ , व इतर परिसरात आज ही कडकडीत बंद पाळण्यात आला आसुन आज ही   रिक्षा, विक्रम रिक्षा बंद असल्याने रस्ते ओस पडले असून नागरिकांनी घराबाहेर न पडून या बंदला चांगला प्रतिसाद दिला आहे.

तीन दिवसीय मुरुड शहर बंद करण्याच्या आवाहनचा आज दुसरा दिवस होता. या बंदला     नागरिकांनी, व्यापारी वर्गानी, भाजीविक्रेेते व इतर दुकानंदरांनी चांंगला प्रतिसाद दिला. पुढील एक दिवस दुकाने बंद ठेवुन सहकार्य करावे जेणे करून कोरोना रोगाचा फैलाव कमी होवुन आपला मुरुड शहरासह तालुका कोरोना मुक्त होईल. ज्यावेळी दुकाने उघडतील त्यावेळी नागरिकांनी दुकानावर गर्दी करू नका   तोडांला मास्क लावुन घराबाहेर पडा, सोशील डिस्टन्सचा वापर करा असे आवाहन कुणाल सतविडकर यांनी केले आहे. या बंदला कोणीतरी समाजकटंकाकडुन गालबोट  लावण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये  राजकारण आणू नये, असे आवाहान मुरुड अ‍ॅक्टीव्ह मेंबरच्या सदस्यांनी केले आहे.

अ‍ॅक्टीव्ह मेंबरचे सदस्य सर्वपक्षीय आहेत तरी यात कोणीही ढवळाढवळ करू नये असे आवाहान अरविंद गायकर यांनी केले आहे. तर मुरुडच्या सर्व दुकानदारांनी बंदला चांगले सहकार्य केल्याबद्दल त्यांना आभार पत्र देवून त्याना सन्मानित करण्यात येणार आहे, असे किर्ती शहा यांनी सांगीतले.

 

अवश्य वाचा

रत्नागिरीत मुसळधार पाऊस