उरण 

उरण तालुक्यातील केगाव ग्रुप ग्रामपंचायत समोर जीवनावश्यक वस्तूंची विक्रीचे दुकाने व त्याच जवळ केगाव ग्रामपंचायत ची घंटा गाडी  ठेवण्यात आली आहे. या घंटागाडील कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोकासंभवत आहे.

ग्रामपंचायत समोरील बाजूस वडापाव विक्रेते ,भाजीपाला व्यावसायिक , जवळच सरकारमान्य धान्य दुकान व जवळच कडधान्य टेम्पो अशी दुकाने आहेत त्यामुळे सर्वत्र लॉक डाऊन असल्याने केगाव परिसरातील ग्रामस्त ,नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी येथे येत असतात  .तेथे कचरा साचलेला असतो ,सफाई केली जात नाही असे येथील नागरिकांचे म्हणने आहे. याच ठिकाणी दुकानाच्यां जवळच केगाव ग्रामपंचायतीने घंटा गाड्या ठेवल्या आहेत .गावातील ,परिसरातील कचरा ,घाण ,दुर्गंधी कचरा घंटा गाडीत गोळा केला जातो . व त्याच गाड्या ह्या ठिकाणी लावल्या जातात .त्यामुळे दुर्गंधी पसरुन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे .सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रदुर्भाव असल्याने येथील इतरत्र या गाड्या लावण्यात याव्यात अशी मागणी जोर घरतेय

 

अवश्य वाचा