पूर्वीच्या काळी तीनशे साठ मंदिरे व त्यांच्यासमोरील तेवढ्याच पुष्करणी (तळी) असलेले अलिबाग तालुक्यातील चौल चंपावतीनगर. चौल-रेवदंडा या जोड नानेही हे गाव प्रसिद्ध आहे. चंपक म्हणजे चाफा, चाफ्याची खूप झाडे इथे असल्याने या नगरीला चंपावती असे नाव पडले. खेरीज रेवदंडा म्हणजे रेवती क्षेत्र. जे गर्सन डिकुन्हा या इतिहास संशोधनाच नोट्स ऑन द हिस्टरी अँड अ‍ॅटिक्किरज ऑफ चौल अँड बसीनफ या 1876 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातत त्यांनी म्हटले आहे. जुन्या काळी इथले कोळी पंचा नावाचे एक वैशिष्ट्यपूर्ण जाळे मासे पकडण्यासाठी वापरत असत. त्यातून चंपावती हे नाव पडले. तसेच रेवती हेही भगवान श्रीकृष्णाचा भाव बलराम याची पत्नी तिला आंदण मिळालेले गाव म्हणजे रेवती क्षेत्र. चौल-रेवदंड्याच्या इतिहास चालू केल्यास अनेक प्राचीन स्थित्यंतरे इथे पाहायला मिळतात.

श्री.शितलादेवी भगवती। ब्रह्मांडासी महाशक्ती, मूळ स्थान चंपावती, भक्ता कारण अवतरली। असे जिचे वर्णन आहे, त्या शितादेवीचे मंदिर अलिबाग तालुक्यात चौल चंपावती नगरीत चौल येथे आहे. नवसाला पावणारे अष्टगरातील हे प्रसिद्ध देवस्थान आहे. चौल हे आंतरराष्ट्रीय व्यापार्‍याचे बंदर होते. अशा या चौल नगरगीत सोळा परवाड्यामध्ये विभागलेली जी तिनशे साठ मंदिरे व तितक्याच असलेल्या पोखरण्ी यामधीलच हे शितलादेवीचे जागृत देवस्थान. चौल चंपावतीनगरीत चंपावती नावाची राणी राज्य करीत होती. या नगरीला समुद्राचा वेढा पडल्याने भरतीच्या लाटेने नगरीची तटबंदी सतत तुटत असे, त्यामुळे समुद्राच्या पाण्यापासून या नगरीला सतत त्रास होत असे. या त्रासाला कंटाळून राणी दुःखी कष्टी होत असे, या संकटातून सुटका होण्यासाठी राणीने अश्‍विन महिन्यातील नवरात्रात एकांतात मौन व्रत पाळून अनुष्ठानास प्रारंभ करून देवीची उपासना केली, राणीच्या या उपासनाव्रताला यश आहे, शितलामाता तिला प्रत्यक्ष प्रसन्न होऊन प्रकट झाली व राणीला म्हणाली, चंपावती राणी काय संकट आहे. सागरावर माझी सत्ता आहे. मला शीतलामाता म्हणतात. त्यावर राणीने समुद्राच्या भरतीपासून नगरीला सतत होणार्‍या त्रासाबद्दल सांगितले. या सागराच्या संकटापासून नगरीचे रक्षण कर असे सांगताच क्षणही न घालवता माझ्या शक्तीने सागराला शांत करीन असे म्हणत हाताील तुंबर देवीने सागरात फेकला व सागराला अडविले. सागर भयभीत होऊन शीतल मातेला शरण गेला व यापुढे चंपावती नगरीला कोणत्याही प्रकाराचा त्रास होणार नाही असे वचन दिले. सागराच्या त्रासापासून नगरीला मुक्त केल्यावर चंपावतीने शितला मातेला राजी करण्यासाठी सिंहासनी बसविले. पूजापात्र घेऊन चंपावतीने मातेची पूजा करून निर्मल गंगाजल, हळद, कुंकू, आभूषणे, कनक, वस्त्र, श्रीफळ अर्पण करुन देवीचा आर्शीर्वाद घेतला. अशातर्‍हेने शितलामातेचे स्थान चौल चंपावती नगरीत निर्माण झाले.

शितलामातेचा दरबार देवदेवतांचे माहेरघर झाले. सर्व देव-देवता मातेच्या दर्शनाला येऊ लागले. अशा या शितळामातेचे मंदिर चौल गावाच्या दक्षिण खाडीजवळ आहे. मुख्य प्रवेशद्वार व सभामंडपावर एक एक कळस असून, सभा मंडपावरील कळस उंच आहे. आंग्रेचे कुलदैवत असलेल्या या शितलादेवी मंदिराचा जीर्णोद्धार आंग्रे यांनी 1759 साली केला. सन 1759 मध्ये बाबूभट उपाध्ये यांनी जीर्णोद्धारासाठी खूप मेहनत घेतली होती. सन 1767 मध्ये विसाजी केशव सरसुभेदार यांनी मंदिरात अर्थसहाय्य ब्राम्हण भोजन घातले. सन 1785 मध्ये एपिलच्या सुमारास राघोजी आंग्रे कुटुंब देवीच्या दर्शनास आले होते. त्याप्रसंगी हत्ती, घोडे, सरंजाम व काही लष्कर बरेच दिवस तळ ठोकून येथे राहिले होते. बााबूराव आंग्रे सन 1805 च्या आरंभी शितळादेवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी बकर्‍याचे पाच मुंडकी वाहिली असे सांगितले जाते. दरवर्षी दसर्‍याच्या दिवशी न चुकता आंग्रे कुटुंब शितलादेवीच्या दर्शनाला येऊन देवीच्या रक्षकांचा मान देत असत.

शितलादेवीच्या पवित्र स्थानाचे फार महत्व आहे. देवी पावन व्हावी यासाठी दर रविवार, मंगळवार, गुरूवार, शुक्रवारी महाराष्ट्रातून भाविक मंडळी येथे येऊन खणानारळांनी देवीची ओटी भरून येणार्‍या अडीअडचणी व समस्या निवारण होण्यासाठी शितळादेवीला कौल लावून नवस करण्यात येतो. त्यानंतर नवसपूर्तीसाठी भाविकजन देवीच्या  दर्शनासाठी येत असतात. गोळबादेवी, भराडादेवी या तिच्या उपदेवता आहेत.

येथे अश्‍विन महिन्यातील शारदीय नवरात्रोत्स येथे मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा करण्यात येतो. पूर्वीचे आंग्रेकालीन जीर्ण झालेले लाकडी कौलारू मंदिर पाडून त्या वास्तूतील देवीच्या मूर्तीला न हलविता व जागा न बनलात, ग्रामस्थांनी जीर्णोद्धार समिती नेमून मंदिराचे नव्याने बांधकाम करुन सुंदर देखणे असे मंदिर बांधले.

मंदिर परिसरात देवीची ओटी भरण्याचे साहित्य, पूजेचे साहित्य, ताजी-ताजी फुले, चौलची नारळाची प्रसिद्ध चिक्की, बकुळीच्या फुलांचे गजरे आदी. वस्तूंची विक्री करणारी दुकाने मांडलेली असतात. विशेषतः हि दुकाने महिला विके्रत्यांची असतात. चौल चंपावती या ऐतिहासिक प्रांताविषयी  दास महाराज म्हणतात.

तीनशे साठ मंदिरे असती देवदेवता तेथे वसती,
मातेच्या दर्शना येती॥

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त