मुरूड जंजिरा 

  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणि चक्रीय स्थिती वेगाने निर्माण होत असल्याने आगामी 10 ते  20 ऑगस्ट  दरम्यान  कोकणात पालघर पासून रायगड, रायगड, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग,  ठाणे  आदी  भागात  अति मुसळधार  पाऊस  कोसळण्याची  दाट  शक्यता  हवामान  खात्याने  वर्तविली  आहे. अरबी  समुद्रावरून वारे  वाहत  असून  समुदाच्या  लाटा  देखील  उसळल्या  आहेत. मच्चीमारी  बंद  आहे. कधी  ऊन तर कधी  पाऊस  अशी   परिस्थिती  आहे. गणेश  उत्सव  जवळ  असल्याने चाकरमानी  कोकणांत जातं आहेत. कोरोना, मुसळधार  पाऊस अशी  परिस्थिती प्रथमच पाहत  असल्याची माहिती  काही  बुजुर्ग  मंडळींनी दिली. यंदा  आधीच्या वादळांनी नागरिकांची आधीच  दाणादाण  उडविली असताना पुन्हा  हे  अस्मानी  संकट  आल्यास खूपच समस्या  निर्माण होऊ  शकतात.

 

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही