Thursday, January 21, 2021 | 01:56 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

आरोग्य सेतू अ‍ॅपबद्दल केंद्रच अनभिज्ञ
रायगड
28-Oct-2020 07:58 PM

रायगड

नवी दिल्ली 

 कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर करण्याचं आवाहन केलं जात आहे. प्रवासासह अनेक ठिकाणी हे अ‍ॅप सक्तीचं करण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही या अ‍ॅपचं कौतुक केलं आहे. मात्र, या अ‍ॅपबद्दल केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय माहिती केंद्र यांनी हे अ‍ॅप कुणी तायर केलं याविषयी काहीही माहिती नसल्याचं उत्तर दिलं आहे. माहिती अधिकारात विचारण्यात आलेल्या माहितीवर हे अजब उत्तर देण्यात आलं असून, केंद्रीय माहिती आयोगानं यावरून फैलावर घेतलं आहे.

 लाईव्ह लॉने हे वृत्त दिलं आहे. केंद्रीय माहिती आयोगाने  मंगळवारी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी  राष्ट्रीय माहिती केंद्राने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आरटीयच्या अधिनियमांनुसार कलम 20 अंतर्गत गुन्हा का दाखल केला जावू नये? असा सवाल केला आहे. या सर्वांवर आरोग्य सेतु अ‍ॅप संबंधित आरटीआयला प्रतिसाद आणि उत्तर न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 आरोग्य सेतूच्या वेबसाइटवर हे अ‍ॅप एनआयसीच्या प्लॅटफॉर्मवर डिझाईन, डेव्हलप आणि होस्ट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.  मात्र, एनआयसीला यासंदर्भात माहिती कशी नाही असा सवाल केंद्रीय माहिती आयोगानं केला आहे. केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त एन. सरण यांनी यासंदर्भात लेखी उत्तर मागितले आहे. तसेच त्यांच्याकडे काही माहिती नसल्यास हीींिीं://ररीेसूरीर्शीीं.र्सेीं.ळप/ ही वेबसाइट र्सेीं.ळप या नावाने वेबसाइट कशी तयार केली गेली, असा सवाल करत त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना फैलावर घेतलं.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top