पेण 

शेतकरी कामगार पक्षाचा 73 वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने प्रत्येक तालुक्याचा पार्टी कार्यालयात साजरा करण्याचा पक्ष श्रेष्टीकडून सांगण्यात आल्याप्रमाणे कोरोनाच्या पाश्‍वभूमीवर सामाजिक दुरावाचा नियम पाळून पेण तालुका शे.का.प.कार्यालया समोर मा.आ.धर्यशिल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करून संपन्न करण्यात आला.

यावेळी धर्यशिल पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्याना शुभेच्छा देवून मार्गदर्शन केले की, देश स्वतंत्र झाल्या नंतर शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली त्या शेतकरी कामगार पक्षाच्या वैभवशाली इतिहासाचे आपण वारसदार आहोत. वर्तमान काळातील काही निवडणुकींचे निकाल कदाचीत आपल्याला नाराज करत असतील परंतु केवळ निवडणुका आणि इतर प्रकारच्या फुटपट्या लावून अंदाज लावता येणार नाही. निवडणुका हा एक भाग असतो आणि पक्षाची समाजासाठी असणारी अवश्यकता हा वेगळा भाग असतो. प्रत्येक पक्ष समाजातल्या काही घटकांच प्रतिनिधीत्व करत असतो. मग कोण धर्माच्या आधारावर कोण समाजवादाच्या आधारावर प्रत्येक पक्षाचा अस्तित्व आपापल्या विचारांना धरून असलेल्या आणि त्या विचारांवर अवलंबुन असलेल्या जनतेच्या आधारावर असते. शेतकरी कामगार पक्षाची समाजाला असलेली अवश्यकता ही कुठली निवडणुक जिंकलो काय हारलो काय म्हणुन या ठिकाणी कमी होत नाही. आपल्याला आपल्या भुमिका पक्क्या केल्या पाहिजेत आणि ज्या कारणा करता शेतकरी कामगार पक्षाचा अस्तित्व या ठिकाणी जन्माला घातल होत त्या कारणा करता पुन्हा एकदा आपण सक्षम होऊन आपण कसे योग्य आहोत हे समाजाला दाखवल पाहिजे. आणि शेतकरी आणि कष्टकर्‍यांना त्याची खात्री पटवून दिली पाहिजे. 

आमदारांनी सांगितले की, प्रचंड संख्येने वर्धापन दिनी आपण एकत्र येण्याची परंपरा असताना आत्ताची परिस्थीती पाहता कोरोनाच्या पाश्‍वभूमीवर आपण आज प्रातिनिधीक स्वरुपाने जमलेलो आहोत. काळाप्रमाणे आपल्याला बदलावे लागते. पण बदलत असताना आपण आपल्या विचारात मात्र बदल करायचा नसतो आपले विचार हिच आपली ताकद आहे. शेतकरी कामगार पक्षाचा जन्म ज्या कारणास्तव झालेला आहे ती पाउलवाट फार काही सरळ सोपी नसून ती खडतर आहे. तरी देखील आपल्याला त्याच पाउलवाटेने एकमेकांचा हात धरून पुढे जायचा आहे. 

या छोटेखाणी कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती अ‍ॅड.निलीमा पाटील, माजी सभापती डी.बी.पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे (हरि ओम), पंचायत समितीच्या सभापती सरिता म्हात्रे, उपसभापती सुनिल गायकर, पंचायत समिती सदस्य ऋतुजा पाटील, चिटणीस संजय डंगर, लाल ब्रिगेड अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, माजी सभापती परशुराम शेट पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य शरद पवार,संदेश ठाकूर, नितीन पाटील, नगरसेवक शोमेर पेणकर, नगरसेवक संतोष पाटील, यशवंत म्हात्रे, चंद्रकांत पाटील, प्रमोद म्हात्रे, कळवे सरपंच कमलाकर मोकल, अंतोरे सरपंच अमित पाटील, दिव सरपंच विवेक म्हात्रे, कालेश्री सरपंच महेश ठाकूर अदि कार्यकत्ये हजर होते.

 

अवश्य वाचा

फरमानशेठ दफेदार यांचे निधन