महाड 

महाड मधील  कोकण कडा मित्र मंडळ आणि शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती तर्फे जेष्ठ शुध्द त्रयोदशी या मराठी तीथीप्रमाणे दरवर्षी साजरा करण्यांत येतो. तीथीप्रमाणे या वर्षी श्रीशिवराज्यभिषेक सोहळा 4 जुन रोजी येत असुन कोरोनाच्या जागतिक संकटामुळे या वर्षीचा सोहळा किल्ले रायगडावर होणार नाही. हा सोहळा कोकण कडा मित्र मंडळाच्या फेस बुक पेज वरुन लाईव्ह करण्याची जय्यत तयारी सुरु आहे. दोन दिवसाचे सर्व कार्यक्रम घरी थांबून महाराष्ट्रांतील शिवभक्तांना पहाण्यास मिळणार आहे. शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक सोहळा प्रत्येकाने आपल्या घरातच साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

किल्ले रायगडवर दरवर्षी श्री शिवराज्यभिषेक दिना निमित्त आयोजित करण्यांत आलेले कार्यक्रमा पैकी सकाळी 10 वाजता जेष्ठ शुध्द द्वादशी या तीथी प्रमाणे होणार्‍या छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त शिवव्याख्याते प्रतिक कालगुडे-पाटील यांचे महाडहून लाईव्ह व्याख्यान होईल, त्या नंतर सायकाळी 4 वाजता शिवतुलादान कार्यक्रम हा प्रत्येकाने आपापल्या परिसरांतील गोरगरीब गरजु कुटूंबाना शिवप्रसाद म्हणुन जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करुन साजरा करावा हे वाटप सक्तीचे नसुन ऐश्‍चिक आहे. यामध्ये एक प्रक्षा एका पेक्षा अनेक वस्तु आपण शिवप्रसाद म्हणुन वाटप करुन सत्कार्य करण्याचे आवाहन आ.गोगावले यांनी केले आहे. संध्याकाळी 6 वाजता पारंपारीक गोधळाचा  कार्यक्रम सुप्रसिध्द गायक अभिजीत जाधव यांच्या पथकाचा आंबेजागाई वरुन लाईव्ह होणार असल्याचे कोकण कडा मित्र मडळाचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी सांगितले. त्याच दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमा मध्ये सायंकाळी 7.30 वाजता रोहित पाटील यांचा गायनाचा कार्यक्रम अलिबागवरुन लाईव्ह होणार आहे. त्यानंतर रात्री 9.30 वाजता शाहिर वैभव घरत पथकाचा कार्यक्रम पनवेलवरुन लाईव्ह होणार आहे याची शिवभक्तांनी नोंद घ्यावी.

या निमित्ताने सकाळी 8.30 वाजता शिवव्याख्याने डॉ.सुमंत टेकाडे यांचे नागपुरवरुन लाईव्ह व्याख्यान होईल. त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता शिवव्याख्याते सौरभ काकडे यांचे पुण्याहून लाईव्ह व्याख्यान होईल. कोकण कडा मित्र मंडळाचा शिवभक्तांनी आपल्या घरांमध्ये राहून हा भव्य दिव्य सोहळा संपन्न करावा. यामध्ये सर्वानी सहभागी व्हावे, तसेच सोशल डिस्टंसचे नियम पाळून, मास्क परिधान करुन हा सोहळा साजरा करावा, असे आवाहन अध्यक्ष सुनिल पवार यांनी दिली.

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....