Tuesday, April 13, 2021 | 01:26 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

देशमुख प्रकरणी सीबीआय चौकशी सुरु
रायगड
06-Apr-2021 08:54 PM

रायगड

 | मुंबई | प्रतिनिधी |

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध सीबीआयने चौकशी सुरु केली आहे. सीबीआयची टीमन मंगळवारी पासून तपासाला सुरूवात  केली आहे. सर्वात आधी सीबीआय परमबीर सिंह यांचा जबाब घेणार गेला. त्यानंतर मुंबई पोलीसचे उपायुक्त राजू भुजबळ आणि त्यांच्या सोबतच एसीपी पाटील यांनाही चौकशीसाठी पाचारण केले जाणार आहे. यांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पालंडे यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. यासोबत सीबीआयची टीम याप्रकरणी पुरावे गोळा करण्याचे काम करेल आणि जर प्रथमदर्शनी तपासामध्ये पुरावे समोर आले तर या प्रकरणात गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.  सीबीआयची चार इन्सपेक्टर रँकचे अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत तर पुढच्या एक ते दोन दिवसांमध्ये एसपी रँकचे अधिकारी देखील मुंबईत दाखल होतील. पुढच्या 15 दिवसांत तपासाचा अहवाल हायकोर्टात साजर केला जाईल आणि त्यानंतर सीबीआय तपासासाठी आणखी वेळ मागण्याचा प्रयत्न करणार आहे. 

राज्य सरकारतर्फे याचिका

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. खुद्द अनिल देशमुख यांच्यासोबतच राज्य सरकारने देखील या प्रकरणाच सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला अनिल देशमुख यांच्या प्राथमिक चौकशीचे निर्देश दिले आहेत. याला विरोध करणारी याचिका राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसेच, लवकरात लवकर या प्रकरणाची सुनावणी घेतली जावी, अशी देखील मागणी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. त्याोबतच परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये अनिल देशमुख यांच्यावर वैयक्तिक आरोप करण्यात आले होते. त्याविरोधात देखील अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top